पुणे ८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती राजधानी दिल्लीतून एक खळबळजनक अपडेट आली आहे, दिल्लीत सुटकेसमध्ये सापडलेल्या नऊ वर्षाच्या मुलीचा मृतदेह आणि मुलीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणात पोलिसांनी 👮 गुन्हा दाखल केल्या चे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे, पोलिसांचे पथक रुग्णालयात पोहोचले तेव्हा डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर मुलीला मृत घोषित केले,लौगिक अत्याचाराची नोंद करण्यात आली,दयालपूर पोलिस ठाण्यात खून, बलात्कार आणि बलात्काराच्या प्रयत्नात खून या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
तर दिल्लीत नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि हत्याच्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे, भारतीय जनता पार्टीने दिल्ली तील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली आहे, भारतीय जनता पार्टीच्या चार इंजिन सरकार मध्येही आमच्या मुली सुरक्षीत नाहीत,असे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे, तसेच गृहमंत्री अमित शाह आणि त्यांच्या चार इंजिन असलेल्या सरकारला उत्तर द्यावे लागेल, दिल्लीच्या मुलींना न्यायासोबतच उत्तरेही हवी आहेत,असे देखील ते म्हणाले,