Home क्राईम लोणावळा येथील भुशी डॅम मध्ये बुडून दोन युवकाचा मृत्यू, वर्षाविहारासाठी आले होते...

    लोणावळा येथील भुशी डॅम मध्ये बुडून दोन युवकाचा मृत्यू, वर्षाविहारासाठी आले होते लोणावळ्यात

    179
    0

    पुणे ८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथून आली आहे, लोणावळा येथे वर्षाविहारासाठी आलेल्या उत्तर प्रदेश येथील दोन युवकाचा डॅम मध्ये पोहताना बुडून मृत्यू झाला आहे, रविवार असल्याने आज हे दोघेजण फिरण्यासाठी येथे आले होते,पण पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघा मित्रांचा मृत्यू झाला आहे.

    दरम्यान भुशी डॅम मध्ये पोहताना बुडून मृत्यू झालेल्या दोन जणांची नावे १)साहिल अश्रफ अली शेख २) मोहम्मद जमाल अशी आहेत.तर हे दोघेजण मुळचे राहणारे उत्तर प्रदेशचे आहे. तर ते कामानिमित्त लोणावळा येथे आले होते, दरम्यान यांच्या बरोबर त्यांचे काही मित्र देखील हे भुशी डॅम मध्ये पोहत होते,ते बुडताना त्यांना त्यांच्या अन्य मित्रांनी बघितले व आरडाओरडा केली पण ते दोघेजण बुडाले, दरम्यान लोणावळा पोलिस व शिवदुर्ग टीम तसेच आपत्कालीन पथक व स्थानिक युवक घटना स्थळी दाखल झाले व त्यांना बाहेर काढले आहे.या दोन्ही मयत मुलांच्या घरी घटनेची माहिती देण्यात आली आहे, या प्रकरणी पुढील तपास लोणावळा पोलिस करत आहेत.

    Previous articleशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे बच्चू कडू आक्रमक
    Next articleभंडा-यात डीसीपी बैठकीत तुफान राडा, आमदार खासदार अपसात भिडले

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here