पुणे ९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुण्यातूनच राजकीय वर्तुळातून आली आहे, जेष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा आज पुण्यात एकाच मंचावर आले आहेत, दरम्यान पुण्यातील वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट मधील कार्यक्रमाला दोघां जणांनी हजेरी लावली आहे, सदरच्या कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी एआयवर चर्चा सत्र भरवण्यात आले आहे, दरम्यान त्यांच्या या एकत्र येण्याने पुन्हा राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे,