पुणे ९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता गॅंगची दहशत कायम असून, पुण्यातील शिवाजीनगर येथील तोफखाना परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास कोयता गॅंगच्या गुंडांनी दोन युवकावर हल्ला करुन त्यांना गंभीर रित्या जखमी केले आहे,यात पोलिसांनी 👮 ४ जणांना अटक केली आहे,तर त्यांचे अन्य साथीदार फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.दरम्यान शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास आयान व फिरोज यांच्यावर हल्ला करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.दरम्यान या भागात वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशन मध्ये समीर शेख ( वय ४८ रा.तोफखान शिवाजीनगर पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. नंतर पोलिसांनी 👮 तातडीने कारवाई करत १) आदित्य बडसकर (वय२२)२)रोहन शिंदे (वय २३ ) ३) अथर्व कदम (वय २४) ४) प्रथम मोहिते (वय २१) सर्व राहणार बहिरट आळी शिवाजीनगर गावठाण पुणे,यांना अटक केली आहे, त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत, या सर्व आरोपींवर खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत,