पुणे ९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुष्पक रेल्वे एक्स्प्रेस मधून दिवा ते मुंब्रा रेल्वे स्टेशन दरम्यान पडलेल्या ५ रेल्वे प्रवासी यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांन द्वारे मिळत आहे, दरम्यान प्रत्यक्षदर्शींच्या म्हणने नुसार १०ते १२ प्रवासी पडले होते, दरम्यान पुष्पक रेल्वे एक्स्प्रेस ही सकाळी मुंबई सेंट्रल वरुन सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी लखनऊ कडे चालली होती.अशी माहिती मिळत आहे, दरम्यान याच वेळी एक लोकल ट्रेन देखील चालली होती दरम्यान यातील प्रवासी पुष्पक एक्स्प्रेस या लोकल मधून पडले याबाबत संध्दीगता आहे,एवढी मोठी दुर्घटना होताना रेल्वे पोलिस व रेल्वे आरपीएफ हे काय करत होते.अशी शंका आता प्रवासी पडले.यात रेल्वे प्रशासनाची मोठी चूक आहे.कसारावरुन चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल मधून प्रवासी पडले असे देखील प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. दरम्यान खाली पडलेल्या प्रवाशांना तातडीने शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यातील ५ प्रवासी यांचा मृत्यू झाला आहे.तर अन्य जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, सकाळी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची संख्या जास्त असते.रेल्वे प्रशासन हे लोकलची व प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवत नाही.रोज अशा घटना घडतात याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.पुष्पक एक्स्प्रेस व लोकल या दोन्ही ट्रेन एकाच वेळी पास होत होत्या पण नेमके हे प्रवासी नेमके कोणत्या ट्रेन मधून पडले हे सांगता येत नाही.असे रेल्वे स्टेशन मास्तर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.जखमी यांना कळवा येथील शासकीय शिवाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.