Home क्राईम मुंबईत मुंब्रा लोकल दुर्घटनेत GRP रेल्वे कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

    मुंबईत मुंब्रा लोकल दुर्घटनेत GRP रेल्वे कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

    94
    0

    पुणे ९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबई मधून आली आहे,आज सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुंबई मधील मुंब्रा लोकल दुर्घटनेत एका तरुण जीआरपी कर्मचाऱ्याचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे, मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव विकी बाबासाहेब मुख्यादल असं नाव आहे. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार कसारा लोकल प्रवाशांनी खचाखच अशी भरलेली होती,काही प्रवासी हे सकाळी कामावर जाण्यासाठी लटकून प्रवास करत होते,त्याच वेळी डाऊनची लोकल या अपच्या लोकलला घासून गेली यात किमान १० ते १२ लोंबकळत असलेले प्रवासी हे रेल्वे ट्रॅकवर पडले मात्र या दुर्घटनेत एकूण ६ प्रवासी यांचा यात दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे, तर काही प्रवासी हे गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना कळवा येथील शिवाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.यात काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे,

    Previous articleथाटामाटात लग्न, नंतर हनिमून अन् भयंकर हत्याकांड, प्रेम संबंधातून केली नव-याची हत्या बेवफा सोनम!
    Next articleबंगळुरू चेंगराचेंगरीनंतर आरसीबीची हायकोर्टात याचिका दाखल

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here