पुणे १० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट ही भंडा-यातून आली आहे, भंडारा जिल्ह्यात आज मंगळवारी वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे, दरम्यान सदरच्या वादळी पावसामुळे ऐतिहासिक पवनी शहरातील चंद्रमणी येथील मैदानावर उभारण्यात आलेली भगवान गौतम बुद्धांची ५१ फूट उंचीची मूर्ती कोसळली आहे, दरम्यान यावेळी मूर्तीचे रंगकाम सुरू होते, तेव्हा अचानकपणे सोसाट्याच्या वा-यामुळे ही मूर्ती कोसळली आहे, दरम्यान सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही, तसेच भंडख-यात अनेक ठिकाणी झाडे देखील उन्हातूळ पडली आहेत, तसेच या वा-या मुळे अनेक घरांचे देखील नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे, दरम्यान यात देखील सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही, दरम्यान पावसामुळे शहरात वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणावर झाली आहे,