पुणे १० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी एक अपडेट ही मुंबई वरुन आली आहे,आज मंगळवारी सकाळी ९ वाजता हार्बरवरील लोकलसेवा ठप्प झाली आहे, तांत्रिक बिघाडामुळे पनवेल व सीएसएमटी अप व डाऊन या मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे, दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीवृड्स ते नेरुळ या रेल्वे स्टेशनवर लोकल थांबविण्यात आल्या आहेत.दरम्यान सकाळी सर्वच चाकरमानी आपल्या कामावर जाण्या साठी निघाले असताना ही लोकलसेवा ठप्प झाल्याने त्यांना याचा मनस्ताप सकाळीच झाला आहे ,तर यातील प्रवासी हे रेल्वे ट्रॅकवर उतरुन बस पकडण्यासाठी जात आहेत, दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या वतीने सदर तांत्रिक बिघाडाचे काम सुरू आहे, त्यानंतरच लोकलसेवा सुरू होईल असे सांगण्यात आले आहे,