पुणे ११ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही अपघाताची पुण्यातून आली आहे, पुण्या मधील वाहनांच्या वर्दळीच्या गंगाधाम चौकात भरघाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दिपाली युवराज सोनी या २९ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला आहे, तर दुचाकीवरील जगदीश सोनी (वय ६५ ) हे गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 👮 ट्रक चालक शौकत आली याला अटक केली आहे, दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगाधाम चौकातील सिग्नल सुटल्यावर दुचाकी स्वार जात होता ,याच वेळी पाठीमागून भरघाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला आहे,