पुणे ११ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मराठा आरक्षण संदर्भात मुंबई वरुन अपडेट हाती येत आहे. दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात आज बुधवार पासून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, राज्य सरकारने एसईबीसी कायद्याच्या अंतर्गत दिलेल्या १० टक्के मराठा आरक्षणा च्या विरोधातील याचिका दिर्घकाळापासून उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.आता न्यायमूर्ती घुगेंच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय पूर्णपीठा घेण्यात येणार आहे, दरम्यान या याचिकेसाठी न्यायमूर्ती रविंद्र घुगे, न्यायमूर्ती संदीप मारणे,व न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांचे विशेष पूर्णपीठ स्थापन करण्यात आले आहे, दरम्यान मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण संदर्भात यापूर्वी अनेकवेळा उपोषण करून या मागण्यांसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आहे.तसेच यासाठी अंतरवली सराटी ते मुंबई अशी रॅली देखील काढण्यात आली आहे,