अहमदाबाद एअर इंडिया दुर्घटनेत ११० प्रवाशांचा मृत्यू, विमान कैंसर हाॅस्पिटलवर कोसळले तिथे २०० रेसिडेन्सी डॉक्टर होते,सर्वात मोठी भीषण दुर्घटना, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
पुणे १२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरुन २४२ प्रवाशांना घेऊन लंडनकडे टेकऑफ केल्यानंतर तांत्रिक बिघाडा मुळे ते लगेच रहिवासी भागात कोसळले लगेच पेट घेतला,या विमानात एकूण १६९ भारतीय प्रवासी होते,तर ब्रिटनचे ५३ व १ कॅनडाचा प्रवासी होते, तसेच २ पायलट व १० क्रू मेंबर होते.आता पर्यंत ११० प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.हे विमान अहमदाबाद येथील कैंसर मेडिकल कॉलेजवर कोसळले आहे.या मेडिकल कॉलेजच्या होस्टेलमध्ये २०० रेसीडेन्टल डॉक्टर उपस्थित होते.
दरम्यान दुर्घटनाग्रस्त विमान जळून खाक झाले आहे, आता घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर रेस्कू टीम कार्यरत आहे.घटनास्थळी आता जेसीबी आणण्यात आला आहे.त्याद्वारे इमारतची मलमा हाटविण्याचे काम सुरू आहे. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या ह्या विमानाला लागलेली आग 🔥 विझवत आहे. भारतीय लष्कराच्या तुकड्या देखील रेस्क्यूचे काम करत आहे, घटनास्थळी गुजरातचे मुख्यमंत्री.गृहमंत्री अमित शाह.पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच हवाई उड्डाण मंत्री देखील निघाले आहेत, दरम्यान एअर इंडियाच्या वतीने हेल्प लाईन नंबर देखील जारी केला आहे.१८००५६ ९१४४४ असा आहे.तर ब्रिटिश हेल्प लाईन नंबर ०२० ७००८५०००असा आहे.दुर्घटनेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,