अहमदाबाद येथून लंडनला २४२ प्रवासी घेऊन टेकऑफ करताच तांत्रिक बिघाडामुळे रहिवासी भागात कोसळले, विमानात गुजरातचे माजी गृहमंत्री विजय रुपानी देखील दुर्घटनाग्रस्त विमानात होते एकच खळबळ
पुणे १२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही अहमदाबाद येथून आली आहे, अहमदाबाद येथील वल्लभभाई पटेल विमानतळावरुन २४२ प्रवासी घेऊन लंडनकडे निघालेले एअर इंडियाचे A1171 हे टेकऑफ केल्यानंतर काहीच मिनिटांत ते तांत्रिक बिघाडामुळे लगेच रहिवासी भागात मेघांनी नगर येथे कोसळले आहे, दरम्यान १ वाजून ३९ या विमानाचा संपर्क तुटला व ते खाली कोसळले आहे.या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान आता विमान कोसळल्यानंतर अग्निशमन दल व एनडीआरएफच्या दोन टीम व विमानतळ प्रशासनाच्या वतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान सदरचे विमान हे रहिवासी भाग असलेल्या मेघांनी नगर येथे कोसळले आहे. दरम्यान विमान कोसळल्यानंतर विमानाने लगेच पेट घेतला आहे.ढगात काळे कुट्ट असे धुराचे लोट आकाशात दिसत आहे.विमान कोसळल्याने या भागातील इमारत देखील पडल्या आहेत.दरम्यान सदर दुर्घटना ही विमानतळ परिसरात झाली आहे.दरम्यान आता जखमींना तातडीने दुर्घटनाग्रस्त विमाना मधून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.दरम्यान ही विमान अपघाताची मोठी दुर्घटना आहे.विमानतळावर सध्या मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिका दाखल करण्यात आल्या आहेत, दरम्यान हे विमान टेकऑफ केल्यानंतर ७०० फुटावरुन लगेच कोसळले आहे.या विमानात दोन पायलट व १० क्रू मेंबर होते,विमान खाली कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला आहे.तसेच एक मोठे झाड देखील पडले आहे.