पुणे १२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही गुजरात येथील अहमदाबाद येथून आली आहे, अहमदाबाद येथील रहिवासी भागात मेघांनी नगर येथे एअर इंडियाचे विमान हे रहिवासी भागात कोसळले आहे,हे प्रवासी विमान होते अशी माहिती मिळत आहे,तर विमान कोसळल्यानंतर मोठ मोठे धुराचे लोट आकाशात दिसत आहे.या विमान दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान या विमानत १३३ प्रवासी असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे,हे विमान टेकऑफ करतांना अपघात झाला आहे,हे विमान अहमदाबाद वरुन लंडनला निघाले होते.