पुणे १२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान टेकऑफ करताच तांत्रिक बिघाडामुळे लगेच खाली कोसळले आहे, व विमान रहिवासी भागात कोसळले आहे.विमान कोसळताच या विमाने लगेच पेट घेतला आहे,हे विमान अहमदाबाद वरुन लंडन कडे चालले होते.या विमानात १६९ भारतीय प्रवासी व ५२ ब्रिटिश प्रवासी होते.तसेच या विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी असल्याचे बोलले जात आहे.एकूण २४२ प्रवासी होते, विमान दुर्घटना मध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या विमानाचा काही भाग झाडाला अडकला होता.तसेच या भागातील इमारत देखील कोसळली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तातडीने गुजरातकडे रवाना झाले आहेत,