Home Breaking News वांद्रेतील ताज लॅंड्स एन्ड मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांची...

वांद्रेतील ताज लॅंड्स एन्ड मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांची भेट

125
0

पुणे १२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून खळबळ जनक अपडेट आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेजण मुंबईतील वांद्रे येथील ताज लॅंड्स एन्ड या हाॅटेलमध्ये दोघांची भेट होत असून दोघांमध्ये आता बंद दाराआड चर्चा सुरू झाली आहे, दरम्यान एकीकडे शिवसेना व मनसे यांच्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हाॅटेलमध्ये दोघांमध्ये चर्चा सुरू झाली आहे, यावरुन आता राज ठाकरे हे महायुती बरोबर महानगरपालिकेच्या निवडणुका मध्ये एकत्र येणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे, दरम्यान या हाॅटेलमध्ये पहिले राज ठाकरे आले व त्यानंतर काहीच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हाॅटेलमध्ये दाखल झाले आहेत.

Previous articleप्रहारचे बच्चू कडूंच्या उपोषणाचा ५ वा दिवस ,प्रहारच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग केला चक्क जाम
Next articleमुंबईत महानगरपालिकेत उध्दव भाऊ की ? देवाभाऊ राज ठाकरे नेमके कोणासोबत एक तास चाललेली चर्चा संपली, चर्चाबाबत निर्णय गुलदस्त्यात?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here