पुणे १३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता पावसाची अपडेट ही पुण्यातून आली आहे, पुण्यात आज जोरात मुसाळधार पाऊस कोसळला आहे.स्वारगेट , हडपसर, डेक्कन, सासवड, या भागात रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे,तर रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे, अनेक भागात झाडा च्या फांद्या तुटल्या आहेत, मुसळधार पावसा मुळे नदी नाल्यांना पूर आला आहे, सिंहगड रोडवर नवले पुलाजवळ असलेल्या पुलाजवळ एक वयोवृद्ध महिला वाहून गेली आहे,या महिलेचा मृत्यू झाला आहे,
तिचा मृतदेह शोधण्यास पोलिसांना यश आले आहे, दरम्यान या महिलेचे नाव शोभा मनोहर माहिमाने (वय ६५ ) असे आहे, डेक्कन भागात गुडाघाभर पाणी साचले होते,तर हडपसर मध्ये देखील रस्त्यावर व दुकानात तसेच घरामध्ये पावसाचे पाणी शिरले होते, सासवड भागात देखील रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.पुणे उपनगरात देखील पाऊस झाला आहे, मुंढवा, खराडी, कोथरूड, बावधन,औंध, बोपोडी, पाषाण,सूस या भागात देखील मुसाळधार पाऊस झाला आहे, पावसामुळे वाहतूक कोंडी देखील झाली होती, दरम्यान अनेक भागात रस्त्यावर पाणी साच्याच्या समस्याने रहदारीत अडथळे निर्माण झाले होते, फुरसुंगी भागात तब्बल एक तास मुसाळधार पाऊस झाला आहे, दरम्यान पावणेसहा वाजण्याच्या सुमारास हा पाऊस कोसळत होता, एकंदरीत आज पुण्यात मुसाळधार पावसाने पुणेकरांची दाणादाण उडविली होती,