पुणे १३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता मुंबईमधून राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती आली आहे. मुंबईच्या कांदिवली मध्ये भारतीय जनता पार्टीच्या दोन गटात तुफान राडा होऊन चक्क हाणामारी देखील झाली आहे, दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार व पोलिस यांच्या समोरच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी देवांग दवे यांना पोलिसांनी 👮 ताब्यात घेतले आहे, दरम्यान देवांग दवे हे मंचावर आशिष शेलार यांना निवेदन देण्या साठी जात असताना माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांनी त्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोप केला जात होता.व त्यानंतर हा राडा होऊन हाणामारी झाली आहे,