Home Breaking News अहमदाबाद विमान दुर्घटना मृतांचा आकडा २७४ ,तर २२० जणांचे DNA सॅम्पल घेतले...

अहमदाबाद विमान दुर्घटना मृतांचा आकडा २७४ ,तर २२० जणांचे DNA सॅम्पल घेतले ७ मृतदेहाची ओळख पटली

94
0

पुणे १४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता वाढला आहे, दरम्यान या घटने बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आधी २४२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, आता या आकडेवारीत वाढ झाली आहे, मृतांची संख्या २७४ वर पोहोचली आहे, तसेच हाॅस्टेलमध्ये डॉक्टर, विद्यार्थी, आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मृतदेह आढळले आहेत, तसेच मृतांमध्ये कर्मचारी व मेघांनी नगरमधील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे,

अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली आहे,प्रवाशांचे मृतदेह पुर्णपणे जळाल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण झाले होते, मृतदेह नेमका कुणाचा? हे कळण्यासाठी आतापर्यंत २२० मृतदेहाचे DNA 🧬 सॅम्पल घेण्यात आले, या DNA तपासणी नंतर फक्त ७ मृतदेहाची ओळख पटली आहे, तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची अद्यापही ओळख पटलेली नाही, दरम्यान DNA करुन ओळख पटलेल्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना देण्यात येणार आहे, दरम्यान आता मृतांची संख्या आता २७४ वर पोहोचली आहे,

Previous articleलोकल अन् प्लॅटफॉर्मच्या जागेत अडकली व्यक्ती ,
Next articleगणपती बाप्पा मोरया! आज संकष्टी चतुर्थी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here