Home Breaking News पुण्यातील‌ अजित पवार यांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेचा गोंधळ, शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी द्या...

पुण्यातील‌ अजित पवार यांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेचा गोंधळ, शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी द्या अशी घोषणा

111
0

पुणे १४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुण्यातूनच आली आहे, पुण्याचे पालकमंत्री तथा अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील कार्यक्रमात दाखल होऊन त्यांनी गोंधळ घातला आहे, दरम्यान यावेळी पुणे पोलिसांचे कडक असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता,पण प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करत कार्यक्रम स्थळी प्रवेश घेऊन आत दाखल झाले, व  अजित पवार यांचे भाषण सुरू होताच या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला,व शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी द्या, यावेळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले, दरम्यान पोलिसांनी 👮 या सर्व प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले आहेत.तसेच राज्य सरकार हे शेतकऱ्यांची फसवणूक करणारे सरकार आहे,असे म्हटले आहे, दरम्यान बाहेर देखील या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला, तोंडी आदेश नको, सरकारने तसा शासकीय अध्यादेश जारी करण्यात यावा  अशी मागणी कार्यकर्ते करत होते.दरम्यान या आंदोलनात प्रहार संघटनेच्या महिला कार्यकर्त्या या मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्या होत्या.

Previous articleपुण्यात पालकमंत्री अजित पवारांनी मेट्रो अधिका-यांची केली 👂 कान‌उघडणी , पालख्या पुण्यात येण्याआधी मेट्रोचा राडारोडा तातडीने काढा अन्यथा मेट्रोवर दंडात्मक कारवाई अटळ
Next articleआता तोंडी आदेश नको आता माघार नाही; प्रहारचे कार्यकर्ते पुण्यात आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here