पुणे १४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पुण्यातूनच खळबळ जनक अपडेट आली आहे, महाराष्ट्रात बेकायदेशीर रित्या वास्तव्यास असलेल्या ४ बांगलादेशी नागरिकांच्या पुणे पोलिसांनी व इंटेलिजन्स यांच्या संयुक्त टीमने मुसक्या आवळल्या आहेत, दरम्यान पुण्यातील कोंढवा येथील एका कामगार वसाहत मधून यांना अटक करण्यात आली आहे, दरम्यान अटक करण्यात आलेल्यांची नावे १) स्वप्न मोंडल २) मिथुन कुमार सांतल ३) रणधीर मोंडल आणि ४) दिलिप मोंडल (सर्व रा.कोंढवा पुणे.) अशी त्यांची नावे आहेत.दरम्यान हे ४ जण पळून जात असताना या बांगलादेशींना लष्कर गुप्तचर विभाग व पुणे पोलिसांनी 👮 अटक केली आहे, आता या चारही जणांची चौकशी लष्कर व पुणे पोलिस करत आहेत,