पुणे १४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुण्यातूनच हाती आली आहे, पुण्यातील पोलिस निरीक्षकाचा अजून एक कारनामा उघडकीस आला आहे, या पोलिस निरीक्षकांनी बोगस जागा मालक दाखवून कोट्यवधी रुपयां ची जमीन बळकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, या प्रकरणी या पोलिस निरीक्षका विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे, दरम्यान या पोलिस निरीक्षकाचे नाव राजेंद्र लांडगे असे आहे,
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, पुण्यातील चंदननगर येथील प्रकरणा नंतर वाघोलीत बोगस जमीन बळकावल्याचा प्रकार आता नव्याने समोर आला आहे, दरम्यान आता या प्रकरणी वाघोली पोलिस स्टेशन मध्ये पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह एकूण १६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी वाघोली पोलिस स्टेशन मध्ये अपर्णा वर्मा यांनी रितसर फिर्याद दिली आहे, दरम्यान पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या विरोधात चंदननगर पोलिस स्टेशन मध्ये यापूर्वी देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे, दरम्यान आता नवीन प्रकरणी फिर्यादी अपर्णा वर्मा यांची पुण्यातील वाघोली येथे १० एकर जमीन खरेदी करून त्या दुबई येथे गेल्या, दरम्यान त्या दुबई येथे असताना अहिल्यानगर, इस्लामपूर, तसेच राजस्थान इत्यादी ठिकाणच्या तब्बल ३ अपर्णा वर्मा नावाच्या महिला पुढे आल्या, दरम्यान ४ महिला यांनी आपणच त्या १० एकर जमीन मालक असल्याचा दावा केला, संबंधित महिला यांनी या प्रकरणी न्यायालयात दावाही दाखल केला होता,त्यानंतर फिर्यादी वर्मा यांना गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी साडेसहा कोटी रुपये त्यांच्या कडून खंडणी वसूल केली, त्यावेळी यातील आरोपी नोयल दास आणि साथीदारांनी जमीन १९९९ मध्ये खरेदी केली असून तिच्यावर आपली मालकी असून आपण परदेशात असल्यामुळे सात बारा उता-यावर नाव लावू शकलो नव्हतो,असा दावा करत फिर्यादीच्या जागेचे बनावट खरेदीखत केले, दरम्यान एकाच जमीनवर अपर्णा वर्मा नावाच्या ४ महिलांनी दावा केला होता, दरम्यान राजेंद्र लांडगे हे चंदननगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक होते, त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या लोकांशी संगनमत करून जमीनचे बनावट खरेदीखत करून जमीन बळकविण्याचा प्रयत्न केला. आता याच पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या विरोधात वाघोली पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे १) पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे,२) नोयल जोसेफ दास,३) ज्योती नोयल दास ४) राहुल नोयल दास ५) रोशनी नोयल दास ६) जाॅक्सन नोयल दास ७) रोहित जाॅक्सन दास ८)गिरिश रामचंद्र कामठे ९) हेमंत कामठे १०) संतोष शेट्टी ११) आदित्य घावरे १२) अमोल भूमकर १३) रामेश्वर बळीराम म्हस्के १४)सह दुय्यम निबंधक कार्यालयातील एक व्यक्ती तसेच याच कार्यालयात दस्त नोंदणी करणारे निबंधक अशा तब्बल एकूण १६ जणांच्या विरोधात वाघोली पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे,