पुणे १४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबईतून आली आहे, मुंबईतील भिवंडी येथे केमिकल साठवलेल्या गोदामाला भीषण आग 🔥 लागली आहे, दरम्यान ही आग इतकी भयानक होती की या आगीने एकूण १२ गोदामे या आगीत जळून खाक झाली आहेत, दरम्यान या आगीची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आता आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत, दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार येथील गोदामात मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील केमिकल असल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकली आहे, या भिवंडीच्या परिसरात आता या केमिकलचा उग्र असा वास व धूर मोठ्या प्रमाणावर पसरल्याने याचा त्रास नागरिकांना होत आहे, प्रामुख्याने डोळे चुरचुरणे व श्र्वासनाचा त्रास जाणवू लागला आहे,