पुणे १५ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही उत्तराखंड येथून आली आहे, दरम्यान आज रविवारी सकाळी केदारनाथ धामहून येथून गुप्तकाशीला जाणारे आर्यन एव्हिएशनचे हेलिकॉप्टर गौरीकुंडच्या जंगलात कोसळले आहे, दरम्यान या हेलिकॉप्टरच्या अपघाताची भीषणता दाखवणारी भयानक दृश्य आता समोर आले आहे, दरम्यान सूत्रांकडून सांगण्यात आले की या हेलिकॉप्टर मध्ये एकूण ६ प्रवासी होते,यात सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे, या अपघातात हेलिकॉप्टर खाली कोसळताच यातील सहा जणांचा घटना स्थळीच मृत्यू झाला आहे,यात एक लहान मुलाचा समावेश आहे, मिळालेल्या माहिती नुसार हे हेलिकॉप्टर केदारनाथ धाम वरुन ६ प्रवाशांना घेऊन गुप्तकाशीला परतत असताना ते घनदाट जंगलात कोसळले आहे.दरम्यान ६ प्रवासी व पायलट असे एकूण ७ जणांचा मृत्यू झाला आहे, दरम्यान यात दोन जण महाराष्ट्राचे आहेत, श्रध्दा राजकुमार जयस्वाल व काशी वय दोन लहान मुलांचा समावेश आहे, दरम्यान आजच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर केदारनाथ धामची हेलिकॉप्टर सेवा रद्द करण्यात आली आहे.