पुणे १६ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही लखनऊ येथून आली आहे,लखनऊ विमान तळावर एक मोठी दुर्घटना टळली आहे,सौदी अरेबियातील जेद्दाह येथून आलेल्या एरव्ही ३११२ या विमानाचा लॅंडिंग दरम्यान विमानाच्या चाकांमधून ठिणग्या आणि धूर येऊ लागला ,या विमानात सुमारे २५० प्रवासी हज यात्रेकरू होते,हे लक्षात येताच,पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलरला माहिती दिली,त्यानंतर अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि फोम आणि पाण्याच्या मारा करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे,