पुणे १७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) ज्ञानबा -तुकाराम आणि जय जय राम कृष्ण हरीचा गजर करत हजारो वारकरी भक्तीमय वातावरणात पंढरपुरकडे प्रस्थान करत आहेत, दरम्यान उद्या दिनांक १८ जून संपूर्ण महाराष्ट्रात हरिनामाचा गजर ऐकायला मिळणार आहे,कारण उद्या बुधवारी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे होणार आहे, तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी दिनांक १९ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपुरकडे होणार आहे, त्यासाठी अनेक वारकरी देहू व आळंदीत दाखल होत आहेत,