पिंपरी -चिंचवड १८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) देहूनगरी आज सुंदर फुलांनी सजली आहे, दरम्यान महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारकरी मोठ्या संख्येने देहूत दाखल झाले होते,आज बुधवारी दुपारी संत श्री तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान होणार आहे, त्यापुर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे पुजन करण्यात आले, वारकरी भक्तीमय वातावरणात तल्लीन होऊन जय हरी विठ्ठल,असा एकच जप करत होते,
दरम्यान पुजा झाल्यानंतर तुकाराम महाराज यांच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणावर वारकरी सहभागी झाले आहेत,वारीत सहभागी झालेले वारकरी टाळ-मृदंगाच्या तालात तल्लीन होऊन पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत, दरम्यान ही पालखी ५ जुलैला पंढरपूरात दाखल होईल दिनांक ६ जुलैला आषाढी एकादशी आहे.