पिंपरी -चिंचवड १८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पिंपरी चिंचवड येथून एक दुर्दैवी अशी घटना घडल्याची अपडेट आली आहे, दरम्यान चिंचवड येथून रस्त्याने जाणाऱ्या एका वारकऱ्याला क्रेनने जोरदार धडक दिल्याने यामध्ये एका वारकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, दरम्यान मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव नारायण गोरावे असे आहे,ते सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील अहिरे गावाचे रहिवासी होते, दरम्यान नारायण हे आज देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूर कडे जाणार होते,पण पालखी सोहळ्यात सहभागी होण्यापूर्वीच काळानं त्यांच्यावर मृत्यूची झडप घातली आहे, दरम्यान हा अपघात कुदळवाडीजवळ झाला आहे, या घटनेनंतर अनेक वारकरी हळहळ व्यक्त करत होते,