पुणे १८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पाऊस कोसळत आहे, दरम्यान आज बुधवारी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत वादळी वा-या सह मुसाळधार पाऊस कोसळणार आहे, दरम्यान तसा इशाराच हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे, कोकणात पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर, तसेच घाट माथ्यावर पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे,तर याच बरोबर मुंबई, ठाणे , नाशिक या भागात ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे,तर नाशिक व उत्तर महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भात येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे,