पिंपरी -चिंचवड १८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज व संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी एकादशी वारी पालख्यांच्या बंदोबस्तासाठी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयाकडून मोठ्या बंदोबस्ताची तयारी केली आहे, दरम्यान या वारीच्या निमित्ताने ३ हजार ५०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्ता साठी फौजफाटा तैनात करण्यात आला आहे,
दरम्यान देहू येथून आज बुधवारी दुपारी संत तुकाराम महाराजांची तर उद्या गुरुवारी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूरला प्रस्थान करणार आहेत, दरम्यान या दोन्ही दिवशी पालखी सोहळ्याच्या मार्गावरील वाहतूक.व पार्किंग तसेच गर्दीचे नियंत्रण व मुख्य म्हणजे वारकऱ्यांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थाच्या दुष्टीने खास करून विशेष अशी उपाययोजना करण्यात आल्या आहेत, त्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनायककुमार चोभे यांनी मोठ्या फौजफाट्यासह पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे, यामध्ये पोलिस सहआयुक्त,अपर आयुक्त व सहा उपायुक्त,११ सहायक आयुक्त,६१ पोलिस निरीक्षक,१७२ उपनिरीक्षक,२ हजार ६३४ अंमलदार,८०० होमगार्ड,तीन राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या,४ बीडीएस पथक,३ रॅपिड कंट्रोल पथक, तसेच १२ स्ट्रायकिंग फोर्स यांचा समावेश असणार आहे, दरम्यान देहू व आळंदी येथे तसेच पालखी मार्गावर ठिकठिकाणी टेहळणी मनोरे उभारले आहेत, त्यावरून संपूर्ण पालखी सोहळ्यावर वाॅच ठेवण्यात येणार आहे, तसेच पालखी सोहळ्यात चोरीच्या घटना घडू नयेत म्हणून गर्दीमध्ये सिव्हिल ड्रेस वरील व वारकऱ्यांच्या वेशात पोलिस सहभागी होणार आहेत, तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर देखील पालखी सोहळ्यावर राहणार आहे,