पुणे १८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील विविध पोलिस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या व पुणे येथून पळून जाऊन सोलापूर येथे असलेल्या पुण्यातील सराईत गुंड शाहरुख उर्फ अट्टी रहिम शेख यांचा सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गावात लपलेल्या शाहरुख यांचा पुणे गुन्हे शाखेचे युनिट ६ च्या पथकाने शनिवारी त्याचा एन्काऊंटर केला आहे, या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे, आता पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या गुन्हे शाखेच्या सहाच्या पथकाला १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, दरम्यान शाहरुख याच्या एन्काऊंटर मुळे पुण्यातील गुन्हेगारी कमी होईल,अशी आशा देखील आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली आहे, दरम्यान शाहरुख याच्यावर पुण्यातील वानवडी, कोंढवा व हडपसर पोलिस स्टेशन मध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.या भागात त्याची दहशत होती,