पुणे २१ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेबाबत आली आहे, मागील आठवड्यात अहमदाबाद येथे मोठी विमान दुर्घटना घडली होती, दरम्यान सदरच्या दुर्घटनेनंतर आता एअर इंडियाच्या कंपनीच्या व्यवस्थेवर बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत,त्यात चौकशी नंतर आता DGCA ने एअर इंडिया मधील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची हाकालपट्टी करण्याचे निर्देशच दिले आहेत, दरम्यान या अधिका-यांना क्रू शेड्यूलिंग,रोस्टारिंगशी संबंधित भूमिकांमधून मुक्त करा,असे स्पष्ट आदेशच DGCAने दिला आहे, दरम्यान मागील काही दिवसांपासून विमानात तांत्रिक बिघाडाच्या घटना घडत आहेत,याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे,अशी माहिती सूत्रांद्वारे मिळत आहे,