पुणे २२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही इराण व इस्त्रायल युद्धाबाबत,आज थेट अमेरिकेने इराणवर हल्ला करुन थेट युध्दात एन्ट्री केली आहे, दरम्यान अमेरिकेने इराणच्या ३ आण्विक तळावर एअर स्ट्राईक केला आहे, या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैनिकांचे अभिनंदन देखील केले आहे, तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी यांनी जनतेला संबोधित करताना इराणवर केलेल्या हल्ल्याची माहिती दिली आहे, तसेच इराणने शांततेच्या मार्गावर आले पाहिजे, असं देखील त्यांनी म्हटले आहे,
दरम्यान अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर इराणने स्पष्ट म्हटले आहे की, सुरुवात तुम्ही केली,आता शेवट आम्ही करणार,अशा कडक शब्दात इराणने थेट अमेरिकेला इशारा दिला आहे, तसेच इराणच्या सरकारी वाहिनीवरुन त्यांनी घोषणा केली आहे, दरम्यान इराण आणि इस्त्रायल यांच्या हल्ल्यात अमेरिकेने इन्ट्री केली आहे, आता युध्दाची त्रीव्रता वाढण्याची शक्यता आहे,तर दुसरीकडे येमेन मधील हुथी बंडखोरांनी अमेरिकेला थेट इशारा दिला आहे,लाल समुद्रात अमेरिकी जहाजांवर हल्ला करणार असल्याचे हुथी बंडखोरांनी स्पष्ट केले आहे,