Home Breaking News श्रीसंत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरमध्ये दाखल

श्रीसंत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरमध्ये दाखल

73
0

पुणे २२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट आली असून जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी दोन दिवसांचा पुण्यातील मुक्कामानंतर आज हडपसरमध्ये दाखल झाली आहे, दरम्यान आज सकाळीच पुणे शहरातून हडपसरच्या दिशेने रवाना झाली होती, दरम्यान हडपसर येथे पालखी दाखल होताच नागरिकांनी पालखीचे जोरदार स्वागत केले, यावेळी सर्व हडपसर परिसर विठू नामाचा गजरात नाहून निघाला, दरम्यान संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती, दरम्यान हडपसर वरुन पालखी लोणी काळभोर येथे जाणार असून पालखिचा मुक्काम लोणी काळभोर येथे आहे, आणि उद्या सोमवारी सकाळी पालखी यवतच्या दिशेने रवाना होणार आहे, दरम्यान आषाढी एकादशी ६ जुलै रोजी आहे.तर संत तुकाराम महाराजांची पालखी ५ जुलै रोजी पंढरपूर येथे दाखल होणार आहे,

Previous articleअमेरिकेने इराणवर हल्ला केला युद्ध पेटले! सुरुवात तुम्ही केली,शेवट आम्ही करणार इराणची अमेरिकेला धमकी
Next articleमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here