Home Breaking News महाराष्ट्रात हिंदी भाषेचा वाद आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत म्हत्वाची बैठक, मनसेचे दादर मध्ये...

महाराष्ट्रात हिंदी भाषेचा वाद आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत म्हत्वाची बैठक, मनसेचे दादर मध्ये आंदोलन

86
0

पुणे २३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) हिंदी भाषेवरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे, दरम्यान यावरून आज सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत म्हत्वाची बैठक पार पडणार आहे, दरम्यान हिंदी भाषेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच अनेक सामाजिक संघटना यांचा प्रचंड असा विरोध आहे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहेत,तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते यांनी हिंदी भाषेच्या पुस्तकांची होळी देखील केली आहे, तर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली दादर येथे दुपारी आंदोलन करण्यात येणार आहे, दरम्यान त्रिभाषा बाबत आज मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक होणार आहे, दरम्यान या बैठकीत हिंदी भाषा संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आजच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवर सर्वांचे लक्ष लागले आहे,

Previous articleइराणच्या ‘या’ निर्णयामुळे पेट्रोल व डिझेलच्या किंमत गगनाला भिडणार ! भारतात देखील होणार प्रचंड वाढ
Next articleचंद्रभागा नदीत बुडणाऱ्या ६ वारकऱ्यांना वाचविण्यात यश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here