पुणे २८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली आहे, महायुती सरकारने राज्यात हिंदी भाषा सक्ती करणार आहे, त्यामुळे शनिवारी ५ जुलै रोजी मनसे व शिवसेना ठाकरे बंधू हे मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र आले आहेत, दरम्यान या मोर्चात अनेक राजकीय पक्ष व अनेक मराठी कलाकार तसेच नेते व मराठी माणूस हा मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षाचे अधिकृत पत्र काढून तसा पाठिंबा जाहीर केला आहे,व अनेक नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत,मात्र महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट या मोर्चा मध्ये सहभागी होणार नाहीत,असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे,व कोणताही नेता व कार्यकर्ते सहभागी होणार नाहीत असे देखील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत,सदरचा मोर्चा हा विरोधी पक्षाने काढला आहे,असे देखील ते म्हणाले आहेत,