पुणे २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मुंबईवरून राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट आली असून, महायुती सरकारने महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीचा GR काढला होता , यावरून मनसे व शिवसेना ठाकरे बंधू व सर्वच राजकीय पक्ष हे एकत्र येऊन याला प्रचंड असा विरोध केला आहे, तसेच ५ जून रोजी सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर मोर्चा देखील काढण्यात येणार आहे, दरम्यान आज याच पार्श्वभूमीवर आज दुपारी मुंबईत मनसे व शिवसेना व तसेच काॅग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मराठी अभ्यास केंद्र व समविचारी संस्थांच्या वतीने हजेरी लावून आंदोलनकर्त्यां कडून हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णयाच्या प्रतिकात्मक जीआरची होळी मुंबईतील आझाद मैदानावर होळी करण्यात आली आहे,