Home Breaking News हिंदी भाषा सक्तीचा जीआर महायुती सरकारकडून रद्द ५ जुलैला होणार ‘विजय रॅली...

हिंदी भाषा सक्तीचा जीआर महायुती सरकारकडून रद्द ५ जुलैला होणार ‘विजय रॅली ‘, पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून वाटण्यात आले पेढे

41
0

पुणे ३० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट आहे, हिंदी भाषा सक्ती च्या विरोधात मनसे व शिवसेना ठाकरे बंधू व अन्य सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत ५ जुलै रोजी मोर्चा काढणार होते, महायुती सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेचा जीआर रद्द केला आहे,आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मोर्चा ऐवजी आता विजय रॅली काढण्यात येणार आहे,असे म्हटले आहे, विजयी मोर्चा काढायचा का सभा घ्यायची?यावर विचार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे, दरम्यान ५ जुलै रोजी कोणतातरी कार्यक्रम नक्की घेणार असे त्यांनी म्हटले आहे,

दरम्यान हिंदी भाषेचा सक्तीचा जीआर मागे घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते यांनी एकच जल्लोष केला आहे, मुंबईत राज ठाकरे यांच्या निवासस्थाना शिवतीर्थ समोर देखील जल्लोष केला गेला आहे, तसेच पुण्यातील गुडलक चौकात मनसे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पुढे वाटून आनंद साजरा केला आहे, एवढेच नाही तर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली आहे,हा असंख्य मराठी माणसाचा विजय आहे,अशा भावना यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत,

Previous articleमुंबईत आजपासून महायुतीचे पावसाळी अधिवेशन सुरू
Next articleपुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील रमेश खरमाळेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मनकी बात मधून सामाजिक कामांबाबत विशेष कौतुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here