दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे वारकऱ्यांची लुटमार, तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आमदार राहुल कुल यांची सदनात धक्कादायक माहिती तसेच कारवाईची मागणी
पुणे १ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही विधानसभा सदनातून आली आहे, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना लुटून अल्पवयीन मुली वर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या बाबत दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी सदनात याबाबत माहिती दिली आहे.व सदर आरोपींना तातडीने गृहखात्याने अटक करून त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करण्यात यावा अशी मागणी सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे,
दरम्यान सदरची घटना सोमवारी पहाटे घडली आहे, पंढरपूरला युको गाडीने वारकरी हे पंढरपूरकडे पहाटेच्या सुमारास जात होते. सदरचे वारकरी हे पहाटेच्या सुमारास दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे महामार्गावर चहा पिण्यासाठी थांबले असता ,एका मोटर सायकल वरुन आलेल्या दोन जणांनी यावेळी महिला वारकऱ्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून तसेच कोयत्याचा धाक दाखवून या वारकऱ्यांना लुटले व एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.सदरची घटना ही गंभीर घटना असून या बाबत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी आज अधिवेशन मध्ये याबाबत सदनाला या बाबतची माहिती देऊन संबंधित आरोपींना गृहखात्याने तातडीने अटक करून सदरचे प्रकरण हे तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणी केली आहे. दरम्यान महामार्गावर सर्वत्र आषाढी वारी निमित्ताने अनेक वारकरी हे पंढरपूरला जात असतात या महामार्गावर पोलिस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर असतो तरी सदरची घृणास्पद घटना घडली आहे, दरम्यान सदरच्या घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, तसेच पुणे ते सोलापूर महामार्गावर रात्रीचा प्रवास हा सुरक्षित आहे का? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक करत आहेत,