आज दौंड नगरपालिकेचे सीईओ तावडे साहेब यांची भेट घेऊन दौंड शहरातील विविध विषय महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी मांडले. सी ओ साहेबांनी आश्वासन दिले आहे की लवकरच सगळ्या प्रश्नांचा तोडगा काढून काम चालू करण्यात येईल. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे अध्यक्ष सचिन गायकवाड, युवक अध्यक्ष अमित पवार, विद्यार्थी अध्यक्ष पंकज नांदखिले, सामाजिक न्याय अध्यक्ष श्रेयस सोनवणे, अमोल आवरे, यश कुलथे, काँग्रेसचे प्रकाश सोनवणे व महाविकास आघाडीतील पदाधिकारी उपस्थित होते.
जर लवकरात लवकर कचरा उचलण्यात नाही आला तर महाविकास आघाडीकडून तीव्र आंदोलन केलं जाईल असे पदाधिकारी लोकांनी सांगितले.