पुणे १ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातून एक खळबळ जनक अपडेट आली असून, पुण्यात सिंहगड रोडवर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.कधी कोयता गॅंगचा धुडगूस तर कधी खून आज चक्क भरदिवसा गजबजलेल्या भागात वडगाव बुद्रुक येथील गजानन ज्वेलर्स या दुकानात ४ अज्ञात व्यक्तीने प्रवेश करुन दरोडा टाकला आहे , दरम्यान या दरोड्यानंतर या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे,सदर घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवारी सकाळी सदर दुकान उघडल्यानंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दरोडेखोर दागिने घेण्याच्या उद्देशाने दुकानात घुसले दुकानातील कामगार यांच्यावर धारदार कोयत्याने सपासप वार करुन सोन्या चांदीचे दागिने व गल्यातील रोख रक्कम असा ऐवज घेऊन घटनास्थळावरून पलायन केले आहे, दरम्यान दुकानातील एका महिला कर्मचारी महिलेवर कोयत्याने वार केल्याने ती गंभीर रित्या जखमी झाली आहे,तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,