Home Breaking News महाराष्ट्रात शक्तीपीठाला त्रीव्र विरोध …मोजणी थांबवली कोल्हापूरात पोलिसांनी राजू शेट्टीला घेतले ताब्यात

महाराष्ट्रात शक्तीपीठाला त्रीव्र विरोध …मोजणी थांबवली कोल्हापूरात पोलिसांनी राजू शेट्टीला घेतले ताब्यात

79
0

पुणे १ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून येत आहे, दरम्यान महायुती सरकारच्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रमाणावर विरोध होता आहे, महाराष्ट्रातील तब्बल २० जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या शक्तीपीठला मोठ्या प्रमाणावर विरोध आहे, दरम्यान आज मंत्रालयाच्या सदनाबाहेरील पार-यांवर सर्व विरोधकांनी विरोध केला आहे,तर कोल्हापूरात पोलिसांनी 👮 शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांना ताब्यात घेतले आहे,

दरम्यान आज १ जुलै मंगळवारी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी तब्बल २० राज्यात रास्तारोको आंदोलन करुन विरोध केला आहे, यावेळी महिला व अनेक शेतकरी यांनी महामार्गावर ठिय्या देत आंदोलन सुरू केले आहे, दरम्यान आज कोल्हापूर, सोलापूर, सांगली, लातूर,व नांदेड परभणी,या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू केले आहे, व शेतजमीन मोजण्यासाठी विरोध केला आहे, दरम्यान आज परभणी जिल्ह्यात सुरवाडी व सोनपेठ तालुक्यातील काही ठिकाणी जमीन मोजणी करण्यास शेतकऱ्यांनी विरोध करत मोजणी करणा-या अधिकारी यांना हाकलून लावले आहे, दरम्यान शेतकऱ्यांच्या विरोधा मुळे अधिकारी मोजणी न करता निघून गेले आहेत,तर कोल्हापूर येथे पोलिसांनी 👮 शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांना ताब्यात घेतले आहे.दरम्यान राज्यातील महिला शेतकरी या प्रचंड प्रमाणावर आक्रमक झाल्या असून डोक्याला  लावण्यात येणाऱ्या कुंकू एवढी जागा देखील सरकारला देणार नाही असे यावेळी म्हटले आहे,तर विरोधी पक्षाच्या सर्वच नेत्यांनी देखील या शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे,तर  शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील महायुती सरकार पोलिसांच्या दबावाखाली शेतकऱ्यांवर दबाव आणत आहे,असे विरोधकांनी सत्ताधारी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे,

 

Previous articleलोणीकर यांच्या वक्तव्यावरून सदनात विरोधकाचा गोंधळ,नाना पटोलेंना १ दिवसभरासाठी निलंबित
Next articleदौंड शहरातील कचरा चा उपाय करा महाविकास आघाडीची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here