पुणे १ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही उत्तराखंड येथून आली आहे, दरम्यान उत्तर खंडामध्ये मुसाळधार पाऊस कोसळत आहे, या मुसाळधार पावसामुळे या ठिकाणी फिरायला गेलेले ६०० पर्यटक हे अडकले आहेत,तर यात २०० पर्यटक हे महाराष्ट्रातील आहे,तर ५० पर्यटक हे मुंबईतील आहेत, तसेच यमुनोत्री धाम रस्ता बंद करण्यात आला असून बचाव पथकांकडून रेस्कू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे,
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तराखंड येथे महाराष्ट्रातून अनेक पर्यटक फिरायला गेलो होतो, यातील २०० पर्यटक अडकल्याची माहिती मिळत आहे, यातील ५० पर्यटक मुंबईतील आहेत, दरम्यान हिमाचल व उत्तराखंड राज्यांमध्ये प्रचंड प्रमाणावर ☁️ ढगफुटी सदृश्य पावसा मुळे अतोनात नुकसान झाले आहे,यात अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत,तर काही ठिकाणी घरात पाणी घुसले होते,तर काही ठिकाणी घरे पडली आहेत, सगळीकडे पावसाचा हाहाकार उडाला आहे, पावसामुळे महापूर आला आहे, अनेक यात्रेकरू या ठिकाणी अडकले आहेत, दरम्यान हवामान विभागाच्या वतीने रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे, या पावसामुळे अडकलेल्या पर्यटकांना रेस्क्यू करण्याचे काम बचाव पथकांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे, दरम्यान महाराष्ट्रातील २०० पर्यटक पैकी ५० पर्यटक हे मुंबईतील आहेत, उर्वरित पर्यटक कुठले आहेत याची अद्याप पर्यंत माहित मिळालेली नाही, दरम्यान यमुनोत्री धाम मध्ये रस्ता खचल्याने ६०० पेक्षा जास्त पर्यटक अडकले आहेत, दरम्यान प्रशासनाच्या वतीने तातडीने सुरक्षाच्या कारणास्तव यमुनोत्री धाम रस्ता बंद करण्यात आला आहे, तसेच प्रशासनाच्या वतीने जागोजागी हायअलर्ट घोषित केला आहे,