पुणे १ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील एक शेतकऱ्यांचा शेतात स्वतः नांगर ओढताना दिसत आहे,हे महाराष्ट्रातील भयानक चित्र आहे,हे कोणत्याही सरकारला नक्कीच भूषाणवह नाही, दरम्यान लातूर जिल्ह्यातील एका वयोवृद्ध शेतकऱ्यांला शेती करण्यासाठी पैसे नसल्याने ते स्वतःच्याच शेतात चक्क नांगर ओढत शेती करावी लागत आहे, दरम्यान शेतकरी अंबादास पवार यांनी आपले दुःख मांडले आहे, यानंतर जेष्ठ नेते शरद पवार गटाच्या महिला नेत्या रोहिणी खडसे यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे, हे सरकार कर्जमाफी करत नाही, तसेच शेतीबाबत चांगले धोरण राबवत नाही, दरम्यान महागाई बाबत तर विसरायचंच,हे दुश्य गंभीर आहे, आणि हे बघून देखील सरकारला पाझर फुटत नाही,हे महायुतीचे सरकार किती गेंड्याच्या कातडीचे आहे, यातून लक्षात येते. असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे,