पुणे १ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे,आज अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे, दरम्यान आज भारतीय जनता पार्टीचे आमदार बबनराव लोणीकर यांनी दोन दिवसां पूर्वी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून काॅग्रेस पक्षाचे नेते सदनात आक्रमक झाले, या मुळे काॅग्रेस पक्षाचे आमदार नाना पटोले यांना आज दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले आहे, दरम्यान विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना दिवसभरा साठी निलंबित करण्यात आले आहे, दरम्यान नाना पटोले यांनी सादनाची माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे,
दरम्यान नाना पटोले यांना निलंबित केल्या नंतर सदनातील सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येत सदनातून बाहेर पडले आहेत,तर काॅग्रेस पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की भारतीय जनता पार्टीचे आमदार लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत वक्तव्य करून तमाम शेतकऱ्यांचा अपमान केला आहे, लोणीकर व मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी केली आहे,