पुणे २ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती वारी संदर्भात एक अपडेट ही पंढरपूरातून आली आहे, आषाढी एकादशी निमित्ताने अनेक वारकरी हे आपल्या विठूराया च्या चरणी दर्शनासाठी मजल दर मजल करत निघाले आहेत, असंख्य वारकरी हे ‘वारीमय’ झाले आहेत,व वातावरणात तल्लीन झाले आहेत, येथे लहानपणापासून वयोवृद्ध तसेच महिला वारकरी आहेत, महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून वारकरी हे लाखोंच्या संख्येने हे पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत जातात,पण लाडक्या विठूरायाला भेटण्याचा उत्साह मात्र कमी होत नाही, ते अगदी बेभान होऊन नाचत आहेत,टाळ मृदंगाच्या गजरात अन् वारकऱ्यांच्या उत्साहात ही वारी पंढरपूर च्या दिशेने चालली आहे, हे तेच फोटोत दृश्य दिसत आहे,
दरम्यान वारकऱ्यांसाठी महायुती सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रीमंडळात एक मोठी घोषणा केली आहे, वारीच्या दरम्यान कोणत्याही कारणावरून वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबीयां ना ४ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे, तसेच वारकऱ्याला ६०% टक्के पेक्षा जास्त अपंगत्व आले तर सरकारकडून ७४ हजार रुपयांची मदत केली जाणार आहे, याबाबत महायुती सरकारकडून नवे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे, दरम्यान यावर्षी ६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशी संपन्न होणार आहे,