पुणे ३ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पावसाची अपडेट आहे दरम्यान महाराष्ट्रात पावसाला चांगलीच सुरुवात झाली आहे,त्यात काल बुधवार रात्री पासून पुण्यात मुसाळधार पाऊस झाला आहे, अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने ओढ्या नाल्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे, दरम्यान दरम्यान सदरचा पाऊस घाट माथ्यावर देखील झाल्याने खडकवासला धरणा मधून तब्बल ६ हजार ४५१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, यामुळे भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.तर आज हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुण्यात दिवसभर पावसाचा जोर राहणार आहे,