पुणे ४ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून, शिवसेना उध्वव ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे व काॅमेडियन कुणाला कामरा या दोघांच्या विरोधात विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे, त्यामुळे आता सोमवारी दिनांक ७ जुलै रोजी नोटीस निघेल, दरम्यान काॅमेडियन कुणाल कामरा यांने महायुतीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर एक व्यंगात्मक कविता बनवली होती, यावरुन महाराष्ट्रात चांगलेच वातावरण तापले होते, या दरम्यान या कवितेचा व्हिडिओ सुषमा अंधारेंनी शेयर करत यावर भाष्य केले होते, दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अपमान कारक भाषा वापरल्याने विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत हा प्रस्ताव आणला होता,