पुणे ५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मुंबईतून विजय मेळावा संदर्भात अपडेट आली असून,आज शनिवारी साडेअकरा वाजता मुंबईतील वरळी डोममध्ये ठाकरे बंधूंचा भव्य व दिव्य असा विजय मेळावा होणार आहे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना गटाकडून जोरदार तयारी केली जात आहे, संपूर्ण मुंबईत ठिक ठिकाणी पोस्टर लावले गेले आहेत, दरम्यान विजयी मेळाव्यानिमित्त दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याने या सोहळ्याकडे महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाचे लक्ष लागले आहे, तब्बल दोन दक्षकानंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार आहेत, दरम्यान या विजयी मेळावा साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे सुप्रिया सुळे व आमदार जितेंद्र आव्हाड येणार असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे,
दरम्यान आज शनिवारी मुंबईतील वरळी डोम मध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेनाचे उध्दव ठाकरे हे दोघे भाऊ एकाच मंचावर येणार आहेत,तर निमित्त आहे,विजय मेळावा, या विजयी मेळावा साठी शिवसेना व मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे, दरम्यान मात्र या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका चर्चेचा विषय बनली आहे, फक्त आवाज मराठीचा,कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचाच अजेंडा,असे या पत्रिकेवर लिहिण्यात आले आहे,आज ठाकरे बंधू काय बोलणार? याकडे तमाम महाराष्ट्रातील मराठी माणसाचे लक्ष लागले आहे,