पुणे ५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मी मराठी भाषा शिकणार नाही,काय करायचे ते करा,असे थेटपणे आव्हान उद्योजक सुशिल केडीयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना दिले होते, तसेच मी ३० वर्षे मुंबईत राहूनही मराठी कळत नाही,असेही वक्तव्य केडियाने केले होते, यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झाले होते, त्यांनी आज केडियाचे ऑफिस फोडले, तसेच त्यांच्या ऑफिसच्या बाहेर पायरीवर नारळ देखील फोडण्यात आला आहे,असे चित्रच पाहायला मिळत आहे,