पुणे २५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबईतील वरळी डोम येथून आली आहे, आज ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी तुफान गर्दी मराठी माणसांनी केली आहे,वरळी डोमच्या गेट बाहेर तुफान गर्दी झाली आहे, या गर्दीतून मार्ग काढत शिवसेना व मनसे नेते आत येत आहेत, बरेच कार्यकर्ते आता बाहेर थांबले आहेत, दरम्यान वरळी डोम येथे मराठी कलाकार मंडळी देखील आले आहेत,
दरम्यान या कार्यक्रमाला मराठी कलाकार भरत जाधव, सिध्दार्थ जाधव, आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित,यांचा समावेश आहे, तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शिवसेना व मनसे कार्यकर्ते तसेच मराठी बांधव देखील आले आहेत, दरम्यान माध्यमांशी बोलताना अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी म्हटले आहे की मराठी माणसांमध्येच खूप गोष्टी विभागल्या आहेत, पण सगळ्यात आधी महाराष्ट्र एकत्र आला पाहिजे,मी मराठी बोलणार नाही,असा अट्टाहास करण्यापेक्षा मराठी बोलण्याचा प्रयत्न करु असे म्हणा अशी भावना देखील अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी व्यक्त केली आहे, अनेक नागरिकांना पोलिसांनी 👮 गेटवर अडवले,तरी देखील पोलिसांबरोबर बाचाबाची झाली आहे, तसेच धक्काबुक्की झाली आहे. आत सभागृह हाऊसफुल झाले आहे, कार्यकर्ते व मराठी माणसांच्या गर्दीवर ताबा मिळवण्या साठी पोलिसांची दमछाक झाली आहे, त्यामुळे पोलिसांच्या संख्येत आता वाढ करण्यात आली आहे,या गर्दीत तरुणांपासून वयोवृद्ध महिला तसेच पुरुष यांची देखील तुफान गर्दी झाली आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठी माणूस व शिवसेना व मनसे कार्यकर्ते मुंबईत वरळी डोम येथे झाली आहे,वरळी डोम गेटच्या बाहेर तुफान गर्दी आहे,या मार्गावर सर्व कार्यकर्त्यांचींच रिघ लागली आहे,